येरवडा : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक
Yerwada Police Arrested Man With Illegal Gun : बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून एक पिस्टल आणि एक राऊंड पोलिसांनी जप्त केले आहे, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
पुणे :- बेकायदेशीररित्या पिस्तूल Pistol बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी Yerwada Police Station सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.शहरात गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी स्थानिक पोलीसांसह गुन्हे शाखा हद्दीत गस्त घालत आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या Pune Police हद्दीत तपास पथकाचे पोलीस हवलदार तुषार खराडे, सुशांत भोसले आणि सुरज बोंबासे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या खास बातमीदारकडून माहिती मिळाली होती की, संगमवाडी येथील दत्त मंदिर मागे दोन संशयित व्यक्ती थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तूल असल्याचे पोलिसांना सांगितले. Pune Crime Latest News
पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील आणि त्यांच्या पथकाने बातमीदार यांनी दिलेल्या बातमीनुसार संगमवाडी येथील दत्त मंदिराजवळ छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले.पोलिसांनी त्याच्या जवळील एक पिस्तूल, एक राऊंड जप्त केल्या असून पोलिसांनी आरोपीचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव रमेश पवार (18 वर्ष, पगडे वस्ती, होली पुणे) सांगितले. येरवडा पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये अभिजीत उमेश अवचरे (18 वर्ष,रा. पिसोळी) श्याम संतोष गायकवाड (19 वर्ष, झेंडेवाडी) अशा एकूण तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील हे करत आहे. Pune Crime Latest News
पोलीस पथक
मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, विठ्ठल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा, छगन कापसे, पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा, पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांनी केलेली आहे. Pune Crime Latest News