मुंबई

Navi Mumbai Police News : नवी मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी हरवलेले 55 मोबाईल परत; 10.50 लाखांचा मुद्देमाल नागरिकांच्या हाती

•पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेची लोकाभिमुख कामगिरी; नागरिकांत समाधान आणि कौतुक

नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत गहाळ व चोरीस गेलेले एकूण 55 मोबाईल फोन शोधून त्यांचे मूळ मालकांपर्यंत परतविण्यात आले असून, या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 10 लाख 50 हजार रुपये आहे.

नागरिकांच्या गुन्हेगारी तक्रारींवर प्रभावी प्रतिसाद देत, पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, आणि अपर आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांच्या आदेशावरून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

CEIR पोर्टलच्या तांत्रिक साहाय्याने मोबाईल शोध मोहिम यशस्वी

CEIR (Central Equipment Identity Register) या केंद्र सरकारने विकसीत केलेल्या ऑनलाईन पोर्टलच्या साहाय्याने मोबाईल फोनच्या IMEI नंबरच्या आधारे हरवलेले मोबाईल शोधण्यात आले.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली.

हरवलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी नवी मुंबई पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक केले. तांत्रिक यंत्रणा, निष्कलंक तपास आणि सेवा वृत्ती यामुळे नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0