Pune Crime News : पुर्व वैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, 8-10 टोळीने धारदार शास्त्रने हल्ला
Pune Crime News Wanwadi Police Arrested Criminal : वानवडी परिसरात खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी जेरबंद वानवडी पोलीस ठाणे येथील तपास पथकाची कारवाई
पुणे :- (22 मार्च) रोजी रात्री 9.45 वा. चे सुमारास हेवन पार्क येथील जंगलात फिर्यादी यांचे सोबत झालेल्या जुन्या झालेल्या भांडण मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेवून फिर्यादी यांना धारधार शस्त्र, लोखंडी रॉड, काचेची बाटली यांनी 8 ते 10 आरोपीनी मारहाण करण्यात आलेली होती. त्याचायत वानवडी पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. कलम 307,506 (2), 324,323,143,148,149,504,506प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. Pune Crime News
गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तपारा पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग तसेच फिर्यादीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीचे आधारे आरोपीताचा शोध घेवून अटक करणेकामी पथके तयार केली होती. तपासा दरम्यान दाखल गुन्हयातील आरोपी बाबत बातमीदारांकडून माहिती काढून शोध घेवून 24 तासाचे आत गंभीर गुन्हयातील आरोपीत यांना जेरबंद करून अटक करण्यात आली आहे.
अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे
1) यश राजन स्वामी, (19 वर्षे) र
2) माधव मुरलीधर घुले, (19 वर्षे)
3) शिवम परशुराम जगताप, (19 वर्षे)
4) यश भारत सहेरीया, (19 वर्ष)
5) शंतनू तुकाराम शिंदे, (20 वर्ष)
6) सँग सलोमन मिरपगार, (22 वर्षे)
7) अशिष विशाल चव्हाण , (19 वर्षे)
8) स्वराज तुकाराम शिंदे, (19 वर्षे)
तसेच 2विधीसंघर्षीत बालक अटक आरोपी याचेकडे अधिक तपास करता आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार Pune CP Amitesh Kumar , पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 05, पुणे शहर आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यानी केली आहे.या गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, दत्तप्रसाद शेडगे, वानवडी पोरटे पुणे. हे करत आहेत.