क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News | विश्रांतवाडी, हडपसर, मुंढवा भागात रात्री घरफोडी करणारा चोरटा जेरबंद

  • विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाची धडक कामगिरी | Pune Crime News

पुणे, दि. ११ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News
Mubarak Jineri

Pune Crime News | पुणे शहरातील विश्रांतवाडी, हडपसर, मुंढवा भागात रात्री घरफोडी करणारा अट्टल चोरटा गजाआड झाला आहे. एका कारवाईत विश्रांतवाडी तपास पथकाकडून लातूर जिल्ह्यातुन आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

संशयित शेखर संभाजी जाधव वय २५ वर्षे, रा. मु. पो. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर याला अटक करण्यात आली आहे.

घरफोडीच्या गुन्हयाचा तपास विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार करत असताना दि. २ ऑक्टोबर रोजी तपास पथकातील पोहवा ७४३५ संजय बादरे, पोहवा ६४६६ अमजद शेख, पोहवा ६४३४ वामन सावंत व पोशि २४४३ किशोर भुसारे यांना अट्टल चोरट्याबाबत माहिती मिळाली होती.

मिळालेल्या बातमीवरून तपास पथकाने संशयित आरोपी शेखर संभाजी जाधव यास मोघा, ता. उदगीर, जि. लातूर येथून चौकशीकामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे गुन्हयाबाबत चौकशी करता तो सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देत होता त्यास अधिक विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले.

तपासामध्ये त्याचेकडून दाखल गुन्हयाततील चोरीस गेलेल्या मोबाईल पॉवर बँक व कार चार्ज असा १,४३,४५०/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला. आरोपीकडून हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, चंदननगर पोलीस स्टेशन हददीतून चोरलेली मोटार सायकल, भोसरी पोलीस स्टेशन हददीतून चोरलेली मोटार सायकल असा एकुण २,४२,५००/- रुपये किंमतीचा माल हस्तगतकरण्यात आला. आरोपीकडून एकुण ३,८५,९५०/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. हडपसर, मुंढवा, चंदननगर, भोसरी पोलीस स्टेशन कडील एकुण ४ गुन्हे उघडकीस आले.

सदरची कामगिरी मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, श्रीमती अनुजा देशमाने, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0