क्राईम न्यूजपुणे

Pune Crime News: दिवाळीत पोलिसांची अनोखी भेट; गहाळ झालेले 6.25 लाखांचे 45 मोबाइल नागरिकांना परत!

Pune Latest Crime News : वानवडी पोलिसांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना दिली भेट

पुणे :- दिवाळीच्या शुभमुहूर्तावर वानवडी परिसरातून Pune Wanwadi Area गहाळ, तसेच चोरीला गेलेल्या 45 मोबाइल संच पोलिसांनी Pune Police परत मिळविले आहे.मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गर्दीच्या ठिकाणांहून मोबाइल संच गहाळ होणे, तसेच चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. Pune Police Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवासादरम्यान व विविध ठिकाणाहून मोबाईल हँडसेट गहाळ झाले बाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे ऑनलाईन तक्रारी तसेच सी.ई.आर.आर. या पोर्टलवर तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. गहाळ झालेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करुन हरवलेले मोबाईल वापरत असलेल्या लोकांना संपर्क करुन कि.रु.6.25 लाखाचे एकूण- 45 मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आलेले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल संबंधीत तक्रारदार यांना परत देण्यात आले आहेत. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार यांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत. Pune Police Latest Crime News

मोबाईल हरविल्यानंतर त्यांची तक्रार पुणे पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट ॲण्ड फाउंट वर तसेच शासनाचे CEIR या पोर्टवर तात्काळ नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसांमार्फत करण्यात येत आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्तरंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-5 पुणे शहर आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक संजय आदलिंग, पोलीस हवालदार अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आनंद दरेकर, महेश गाढवे, दया शेगर, हरी कदम, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमा कांबळे, गोपाळ मदने, यतिन भोसले, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, सुजाता फुलसुंदर यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0