Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या सराईत दोन आरोपींना अटक ; 2.21 लाखांचा मुद्देमाल जप्त
•पुणे शहराच्या येरवडा परिसरातील गाडी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून 2 गुन्हे उघडकीस
पुणे :- येरवडा पोलीसांनी Yervada Police Station वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 2 लाख 21 हजार रुपयांचं मुद्देमाल जप्त केले आहेत. पोलीसांनी आरोपींकडून सहा मोबाईल फोन आणि दोन मोपेड वाहन असा मुद्देमाल जप्त केला आहे. Pune Crime News तसेच आरोपींच्या विरोधात असलेल्या 2 गुन्हे उघडकीस आणले आहे.
पुणे शहरांमध्ये वाढत्या वाहन चोरीच्या घटनेने पोलीस आयुक्त आणि पोलीस सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पोलीस उपायुक्त परिमंडळ-40, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर यांनी हद्दीतील पेट्रोलिंग करून वाहन चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे सूचना दिल्या होत्या.
येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान तपास पथकाचे पोलिस अंमलदार सुशांत भोसले आणि अनिल शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, दोन संशयित व्यक्ती दोन मोपेड गाडी विक्रीसाठी येरवडा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. Pune Crime News तपास पथकाने त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके येरवडा पोलीस ठाणे यांना कळविले. पोलिसांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील साळुंखे आणि अंमलदार सुशांत भोसले, अनिल शिंदे,विजय अडकमोल, स्वप्निल घोलप यांनी तेथे जाऊन संशयित आरोपींवर नजर ठेवली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली असता दोघांनी आपले नावे यश सागर ओंबाळे (23 वय रा. दुर्गा माता मंदिर जवळ कंजार भाट येरवडा पुणे) ओमकार राजेश मोरे (21 वय, रा. रामनगर येरवडा पुणे) असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील दोन मोपेड गाड्या आणि सहा मोबाईल फोन जप्त केले आहे. पोलिसांनी चौकशी करीत असताना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 35(ई) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीसांनी आरोपींची चौकशी केली असता आरोपींवर गाड्याबाबत चतुश्रृंगी पोलीस ठाणे आणि शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. दोन गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील दोन गाड्या आणि सहा मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस पथक
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह-आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव, पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-4, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा, पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे पोलीस नाईक सागर जगदाळे, अनिल शिंदे, पोलीस अंमलदार सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, स्वप्निल घोलप, विजय अडकमोल यांनी केलेली आहे.