पुणे

Pune Crime News : चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून 19 प्लास्टिक हत्ती कैन्ड मध्ये 700 लिटर गावठी दारू जप्त केली

पुणे :- शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला गालबोट लागू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे याकरिता पोलीस आयुक्त यांनी शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. हडपसर पोलिसांनी अशाच प्रकारे कारवाई करत अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून 700 लिटर गावठी दारू टेम्पो सह जप्त केली आहे. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर तपास पथकातीत अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड असे पहाटे च्या सुमारास पोलीस ठाणे हद्दीत रात्रगस्त करीत असताना, पोलीस अंमलदार श्रीकांत पांडुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, मारूती कॅरीअर वाहन या वाहनातुन अवैध दारूची वाहतुक होत आहे. मिळालेल्या बातमीच्या आधारे रात्रगस्त अधिकारी उमेश रोकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड यांनी 15 नंबर चौक येथे सापळा रचून गाडी आडवून त्यातील व्यक्तींना अटकावून ठेवून त्यांना त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे राहुल दामोदर बनसोडे (42 वर्ष रा. काळुराम मंदीराजवळ, सिद्राम मळा, लोणीकाळभोर) सोमनाथ पोपट कांबळे (22 वर्ष )असे असल्याचे सांगीतले. त्यांच्या मारूती कॅरीअर या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये 19 प्लॅस्टीकचे हत्ती कैन्ड त्यामध्ये अंदाजे 700 लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. गुन्ह्याचे पुढील तपासाकरिता टॅम्पो व गावठी दारू असा एकूण 2 लाख 47 हजार 500 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच आता आरोपींच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हीबिशन ॲक्ट कलम 65 (अ), 65(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक दिपक कांबळे हे करीत आहेत.

पोलीस पथक
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 यांचे मागदर्शनाखाली अश्विनी राख, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, पोलीस अंमलदार, दिपक कांबळे, समीर पांडूळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago