takrar nivaran din pune police
पुणे, दि. १४ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी
महाराष्ट्र मिरर Pune Crime News
Pune Crime News | पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार Pune CP Amiteesh Kumar यांच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत पुणेकरांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी परिमंडळ निहाय व स्थानिक पोलीस ठाण्यांना आदेशित केले आहे. पोलीस आयुक्तांच्या स्त्युत्य उपक्रमामुळे पुणेकर नागरिकांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे. Pune Police
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले आहेत. Pune Crime News
स्थानिक पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्यास अथवा आडमुठी भूमिका घेत असल्यास ‘तक्रार निवारण दिन’ वेळी त्याची उपायुक्त अथवा सहायक पोलीस आयुक्त यांच्यासमोर त्याची बाजू मांडता येणार आहे.
परिमंडळ १ ते ५ पोलीस उपायुक्त क्रमश: १. खडक, २. भरती विद्यापीठ, ३. सिंहगडरोड, ४. येरवडा, ५. कोंढवा येथे हजर असणार आहेत. तर गुन्हे उपायुक्त वारजे माळवाडी, मुख्यालय उपायुक्त हडपसर, आर्थिक व सायबर उपायुक्त बंडगार्डन, विशेष शाखा उपायुक्त शिवाजीनगर, वाहतूक उपायुक्त चतुःशृंगी येथे उपस्थित राहतील. सहायक पोलीस आयुक्त समर्थ, बंडगार्डन, विश्रामबाग, सहकारनगर, वारजे माळवाडी, पर्वती, चतुःशृंगी, लोणीकंद, हडपसर, वानवडी, चंदननगर, डेक्कन, आंबेगाव, काळेपडल येथे उपस्थित राहणार आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…