क्राईम न्यूज

Pune Crime News : एफ.सी. रोडवर थरार! गावठी पिस्तूलसह गुन्हेगाराचा पाठलाग करून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Latest Crime News : रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक टॅकलला एफ.सी. रोडवर अटक; 11 तासांच्या आत कारवाई

पुणे :- पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर (F.C. Road) आज सकाळी एका थरारक घटनेचा अनुभव आला. गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून शिताफीने पकडले. या धडाकेबाज कारवाईमुळे शिवाजीनगर पोलीस स्टेशनने गुन्हेगारांमध्ये चांगलाच धसका भरवला आहे. Pune Latest Crime News

काय घडले नेमके?

पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार अभिषेक राजू टेंकल (वय 23) हा एफ.सी. रोडवर पिस्तूल घेऊन फिरत आहे. ही बातमी मिळताच, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

पोलिसांना पाहताच, अभिषेक टेंकलने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला क्षणातच पकडले. त्याच्या कमरेला तपासणी केली असता, तब्बल 36 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि मॅगझीनमध्ये एक जिवंत काडतूस सापडले. ही संपूर्ण कारवाई अवघ्या 11 तासांत पूर्ण करण्यात आली.

ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार दीपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर बलटे आणि पोलीस कर्मचारी सचिन जाधव, दीपक रोमाडे, इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांचा मोलाचा सहभाग होता.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago