Pune Crime News | लोणीकाळभोर मोक्यातील फरार गुंड अखेर गजाआड ; गुन्हे शाखा युनिट ६ कडून कारवाई
पुणे, दि. १९ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News |
लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात दाखल मोक्का गुन्ह्यात पोलिसांना ६ महिन्यापासून गुंगारा देणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट-६ कडून जेरबंद करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त गुन्हे, अमोल झेंडे DCP Amol Zende, सपोआ सतीश गोवेकर ACP Satish Govekar यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि उल्हास कदम Sr.Pi. Ulhas Kadam व Unit-6 पथकाने आरोपीस सासवड येथून ताब्यात घेतले.
आरोपी ऋषीकेश किसन खोड, वय 24, रा पांडवनगर, वडकी, ता हवेली, जि पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Pune Crime News, Maharashtra Mirror
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु र नं 48/2024 भा दं वि कलम 387, 143, 148, 149, 504, 506 सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1)(1),3 (2) 3 (4) प्रमाणे मोक्यातील गुन्ह्यात आरोपी ऋषीकेश खोड गेल्या ६ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
दि. 18 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट हद्दीत पाहिजे व फरार आरोपींचा शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त करीत असताना समीर पिलाने यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी ऋषीकेश किसन खोड हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी पळून जात असता पाठलाग करून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
सदरची कामगिरी (Pune Police) शैलेश बलकवडे (अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे), अमोल झेंडे (पोलीस उप आयुक्त गुन्हे), सतीश गोवेकर (सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे 2) या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम ,पो हवा विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो ना कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पो अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.