
- परिमंडळ ५ पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे
पुणे, दि. २७ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी : Pune Crime News
Pune Crime News | पुणे शहर आयुक्तालयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक पाऊले उचलली आहेत. आज परिमंडळ ५ हद्दीतील हडपसर, कोंढवा, मुंढवा, बिबवेवाडी येथील ५ सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिले आहेत.
सराईत आरोपी किशोर अमर सोळंकी (हडपसर), अक्षय अनिल पवार (हडपसर), कादिर उर्फ काजू आरिफ अन्सारी (कोंढवा), साहिल रफिक कलादगी (बिबवेवाडी), करण हरिदास जाधव (मुंढवा) यांच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगारांना पुणे शहर Pune Police, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.