Pune Police Latest News : पुण्याच्या एकाच इमारतीमध्ये घरांमध्ये चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना अटक एका अल्पवयीन मुलीचा सहभाग
पुणे :- कोंढवा पोलीस ठाण्याच्या Kondhwa Police Station हद्दीत प्रतिभा हौसिंग सोसायटी या इमारतीमध्ये एकाच वेळी चार फ्लॅटमध्ये चोरी करणाऱ्या तीन अनोळखी आरोपींच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तीन आरोपींमध्ये एक आरोपी एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. Pune Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे रौफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे यांनी सूचना दिल्यानंतर तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी समीर उर्फ अल्फाज हनीफ भाई शेख (18 वय रा. हडपसर पुणे), महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण (19 वय, रा. हडपसर पुणे) आणि अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पोलीस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे, मयूर मोरे यांनी उघड केले असून आरोपी समीर याला 14 नोव्हेंबर दरम्यान अटक केली असून त्याच्या जवळून दहा हजार रुपये किमतीची होंडा डिओ ही गाडी जप्त केले असून हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध भादवी कलम 302 (2) प्रमाणे गुन्हा उघड करण्यात आला आहे. Pune Latest Crime News
आरोपी महया उर्फ महेश चव्हाण यांनी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपोडी व मोटरसायकल चोरीचे गुन्हे असल्याबाबतची गुप्त माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव अक्षय शेडगे यांना प्राप्त झाली होती. आरोपीला पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने घेऊन ताब्यात घेतले असून कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरुद्ध सहा घरफोडी चे गुन्हे उघड करण्यात आले आहे. पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने रोख रक्कम असे एकूण 1 लाख 31 हजार 640 रुपये किमतीचा मध्यभाग जप्त केला आहे. तसेच आरोपीकडून तीन लाख 9 हजार 796 किमतीचा मुद्यमान जप्त केला आहे. पोलिसांनी एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त पुर्वे प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ -5 राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धंन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनय पाटणकर, यांचा पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पो उप निरी बालाजी डिगोळे, अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत जाधव, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेडगे यांनी केली आहे.