Pune Crime News : येरवडा येथील चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

•पुणे शहरात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी एक विशेष तपास पथक तयार केले.
पुणे :- पुणे शहरातील वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीची मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सुरज संतोष माने, (वय 24, रा. रामनगर, येरवडा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहे.पुणे शहरातील मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस हिम्मत जाधव, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी एक विशेष तपास पथक तयार केले.पोलीस हवालदार तुषार खराडे, पोलीस अंमलदार बालाजी सोगे, भिमराव कांबळे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी प्राप्त झाली की रामनगर येथुन पांढरे रंगाची ॲक्टीव्हा चोरी केलेला व्यक्ती दुचाकी विक्री करण्याकरीता मेंन्टल ग्राऊंड येरवडा येथे आलेला आहे.या माहितीच्या आधारे,मेंन्टल ग्राऊंड येरवाड येथे पोलिसांनी सापळा रचला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस अंमलदार तुषार खराडे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, प्रशांत कांबळे, नटराज सुतार यांनी त्यास पळून जात असताना अतिशय शिताफीने संशयित आरोपी तेथे चोरीच्या दुचाकींची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले आहे.



