पुणे, दि. 10 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी | Pune Crime News
वानवडी पोलिस ठाण्यात दाखल मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. यावेळी वानवडी पोलिसांनी आरोपींना अटक करून हजर करताच त्यांना कोर्टात जामीन मिळाल्याने पोलिस प्रशासन व न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. Pune Crime News
वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०५/२०२३ भादवि कलम १४३,१४४,१४७,१४८,१४९, ३०२, ३०७.३२३.५०४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७. महा. पो.अधि. कलम ३७ (१), ३७ (३) सह १३५ या गुन्हयामधील आरोपी १) सिकंदर आयुब शेख/सय्यद, वय ३४ वर्षे, रा.लेन नंबर १९ सय्यदनगर हडपसर पुणे २) जाकीर कादीर सय्यद, वय ४२ वर्षे, रा. सदर ३) अमिर अकील सय्यद, वय २३ वर्षे, या आरोपींना विजापुर, राज्य कर्नाटक हद्दीतुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन युनिट-५ गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले होते. आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन वेगवेगळ्या ठिकाणी आपली ओळख लपवुन वास्तव करीत होते. तसेच नमुद आरोपी हे यातील फिर्यादी यांना वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जिवे ठार मारण्याची धमकी देत होते.
सदर आरोपींना गुन्हे शाखेने पुढील कारवाई करिता वानवडी पोलिस ठाण्याकडे सुपुर्द केले होते. वानवडी पोलिसांनी आरोपींना कोर्टापुढे हजर करताना प्रोसिंडींगच्या चुकीमुळे थेट जामीन मिळाला आहे.
मोक्कातील आरोपींना थेट जामीन मिळाल्याने पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे तर न्यायपालिकेतदेखिल यावरून चर्चा रंगली आहे.
कोर्टाकडून आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ सूटका झाल्याचे समजते. यानंतर पोलिसांना चूक लक्षात येताच पुन्हा आरोपींचा शोधाशोध सूरू झाल्याची माहिती आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…