पुणे

Pune Crime News : घरात मोलकरीण म्हणून यायची अन माल लंपास करायची ! येरवडा तपास पथकाने फोडले बिंग

•Pune Crime News मोलकरीण निघाली सराईत गुन्हेगार, दोन गुन्ह्यांमध्ये केली होती लाखोंची चोरी, पोलिसांकडून महिला जेरबंद

पुणे :- कल्याणी नगर येथे असलेल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेने लाखोचा गंडा घातला आहे. महिला घर कामाच्या नावाने घरामध्ये नोकरी मिळवायचे आणि त्यानंतर त्या घरात चोरी करायची असे बिंग येरवडा पोलिसांनी फोडले आहे. कल्याणी नगर उच्चभ्रू सोसायटीमध्ये 28 मे रोजी घरातील मोलकरीण फिर्यादी यांच्या घरातून 13 लाख 36,800 किमतीचे 260 ग्रॅम चे जुने चांदीचे दागिने लंपास केले होते. याबाबतचे फिर्यादी येरवडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी 381 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. चोरीच्या घटना संदर्भात पोलिसांनी एक पथक तयार करून घटनेचा उलगडा करण्यास सांगितले.

आरोपी महिलेला अटक

तपास पथकातील पोलीस हवलदार तुषार खराडे, किरण घंटे पोलीस अंमलदार सुशांत भोसले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे आरोपी महिलाही तिच्या मूळ गावी किन्हई कोरेगाव सातारा येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीची कळविले असून पोलिसांनी तातडीने एक पथक तयार केले तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलिस अंमलदार तुषार खराडे कैलास डुकरे, महिला पोलीस अंमलदार श्यामलाता देवकर यांना सातारा येथे जाण्यास सांगितले. या पोलीस पथकाने संशयित महिलेला ताब्यात घेतल्या असून तिचे नाव सायली संतोष कार्वे (22 वर्ष) असे असल्याचे सांगितले. त्या महिलेकडे चौकशी केली असता ती महिला कल्याण नगर मधील एका सोसायटीमध्ये लहान मूल सांभाळायचे काम करायची तसेच घरात कोण नसताना त्या संधीचा फायदा घेत घरात चोरी करायची कबुली महिलेने दिली. 31 मे 2023 रोजी गुन्हा केल्याचा तपासात निष्पन्न झाले. तसेच या महिलेने यापूर्वी अशाच प्रकारे आंबेगाव परिसरात एका घरात लहान मुलाला सांभाळताना चोरी केल्याचे कबुली दिली त्याविरुद्ध भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या सर्व घटनेबाबत 64 gm सोन्या चांदीच्या दागिनेजेची किंमत चार लाख रुपये आहे. पोलिसांनी तपासा दरम्यान महिला आरोपीकडून दोन गुन्हे उघडकीस आणून जवळपास 17 लाख 11 हजार आठशे रुपये किमतीचा सोन्या चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस पथक
मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, विजयकुमार मगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-4, विठ्ठल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, रविंद्र शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे यांचे गार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, प्रदिप सुर्वे, पोलीस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विट्टल घुले यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0