पुणे, दि. ११ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
वानवडी हद्दीतील शांतीनगर भागात एकाला पिस्टल व कोयत्याचा धाक दाखविणाऱ्या सराईत गुन्हेगारांना वानवडी (wanwadi) तपास पथकाने महेदवीनगर सहकारी गृहरचना सोसायटीचे अंतर्गत डिजने पार्क सोसायटी मधील मोकळे मैदानातील कंटेनरचे मध्ये लपुन बसलेले असताना अटक केली आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड आणि एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला. (pune crime news)
याप्रकरणी आरोपी १) आकाश गोरख कांबळे, रा. कोहीनूर हॉटेल जवळ, कॅम्प, पुणे २) मयुर दिगंबर वाघमारे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे व ३) शिवम परशुराम जगताप, रा. एसआरपीएफ क्वार्टर्स, वानवडी, पुणे यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पंडीत गॅरेजजवळ, शांतीनगर, वानवडी, पुणे येथे एकाला पिस्टल व कोयता दाखवुन धमकावले प्रकरणी वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४२०/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३५१(३), ३५२, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयातील आरोपी नामे १) आकाश गोरख कांबळे, रा. कोहीनूर हॉटेल जवळ, कॅम्प, पुणे २) मयुर दिगंबर वाघमारे, रा. काकडे वस्ती, कोंढवा, पुणे व ३) शिवम परशुराम जगताप, रा. एसआरपीएफ क्वार्टर्स, वानवडी, पुणे हे सदरचा गुन्हा करुन फरार झाले होते. त्याअनुशंगाने वानवडी पोलीस (Wanwadi Police Station) ठाणेकडील पोलीस उप-निरिक्षक संजय आदलिंग व पोलीस अंमलदार महेश गाढवे, सर्फराज देशमुख, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, दाऊद सय्यद, अमोल पिलाणे यांनी नमुद फरार आरोपींबाबत अत्यंत चिकाटीने माहीती काढुन, आरोपींचे ठावठिकाण्याबाबत माहीती मिळवली. त्याप्रमाणे नमुद आरोपीत हे महेदवीनगर सहकारी गृहरचना सोसायटीचे अंतर्गत डिजने पार्क सोसायटी मधील मोकळे मैदानातील कंटेनरचे मध्ये लपुन बसलेले असताना त्यांना दिनांक. ०७/०७/२०२४ रोजी ताब्यात घेवुन वानवडी पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडे अत्यंत शिताफीने तपास करुन त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी यांना दाखविलेले ३०,०००/-रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व ५००/-रुपये किंमतीचा एक जिवंत राऊंड आणि ३००/-रुपये किंमतीचा एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच यातील आरोपी आकाश कांबळे, रा. कोहीनूर हॉटेल जवळ, कॅम्प, पुणे हा पुणे शहरातुन तडीपार असल्याने त्याचेवर त्याअनुशंगाने कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई ही मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर Pune Police, आर राजा, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे शहर, गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व संजय पतंगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, संजय आदलिंग, व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, महेश गाढवे, सर्फराज देशमुख, दाऊद सय्यद, संदीप साळवे, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, यतीन भोसले, सोमनाथ कांबळे, गोपाल मदने, अमोल पिलाणे या विशेष पथकाने केली आहे.
सदर गुन्हयाचा अधिक तपास हे पोलीस उपनिरिक्षक संजय आदलिंग करीत आहेत.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…