क्राईम न्यूज

Pune Crime News : रात्रीतच राडा! चिंचवडमधील वाल्हेकरवाडीत 5 जणांच्या टोळक्याकडून 9 वाहनांची तोडफोड

Pune Latest Crime News : मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा करत काचा फोडल्या; एक अटकेत, चार अल्पवयीन ताब्यात

पिंपरी | चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात गुरुवारी (26 जून) रात्री मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर दहशत निर्माण करत पाच जणांच्या टोळक्याने एकूण नऊ वाहनांची दगडफेक करून तोडफोड केली. याप्रकरणी गिरीश शशिकांत लोंढे (19 वय) याला अटक करण्यात आली असून, त्याचे चार अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहेत. Pune Latest Crime News

ही माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिली आहे.घटनेदरम्यान, टोळक्याने 5 कार, 3 टेम्पो आणि 1 रिक्षा अशा एकूण 9 वाहनांची काचफोड केली. ही घटना रात्री सुमारे 2.30 च्या सुमारास घडली. स्थानिक नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या वाहनांवर टोळक्याने दगडफेक करत गोंधळ घातला.घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि गुंडविरोधी पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून अवघ्या तीन तासांत आरोपींचा शोध घेतला. आरोपींच्या या कृत्यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

vivek

Recent Posts