पुणे

Pune Crime News : पुणे हादरले! माजी नगरसेवकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या मुलावर गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू

• नाना पेठेत थरार, भरदिवसा गोळ्या झाडून खून; आंदेकर कुटुंबासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस आयुक्त म्हणाले, ‘कोणालाही सोडणार नाही.’

पुणे :- शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनीच आता खुनी हल्ला केला आहे. नाना पेठेमध्ये शुक्रवारी सायंकाळी भरदिवसा गोविंद उर्फ आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याचा नाना पेठेमध्ये खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर (वय 70) यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बंडू अण्णा आंदेकर, त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही फिर्याद कल्याणी गणेश कोमकर यांनी दाखल केली आहे.

या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे त्यांनी सांगितले. ‘या गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील,’ असे सांगत त्यांनी गुन्हेगारांना थेट इशारा दिला आहे. या खुनामुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची भीती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0