Pune Crime News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-6 कारवाई ; गावठी हातभट्टीची दारु तयार करणारे दोन अड्डे उध्वस्त
•लोणीकंद पोलीस आणि लोणी काळभोर ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुणे :- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-6 मोठी कारवाई करत एकाच दिवशी दोन हातभट्टी गावठी दारू तयार करणारे अड्डे उध्वस्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. लोणीकंद आणि लोणी काळभोर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे वेगवेगळे दोन हातभट्टीचा व्यवसाय या महिला करत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून खबरदारी म्हणून अवैधरित्या धंदे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-6 हद्दीत अवैध धंदे चालू असल्याची माहिती पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे आणि ऋषिकेश ताकवणे यांना मिळाली होती. पेरणे ते डोंगरगाव रोडवर एक महिला भट्टी लावून दारू तयार करत असे अशी खात्रीदायक माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता शितल गणेश परदेशी (23 वय, रा. मोलाई चौक पेरणे, ता. हवेली) यांच्या घराच्या मागे भट्टी लावून दारू काढत असताना मिळून आली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे 140 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 2500 हजार लिटर कच्चे रसायने आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 98 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच महिलेला ताब्यात घेतले असून तिच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा कारवाईत पोलिसांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समता नगर येथे मंगला संगम आडगळे (45 वय रा. समता नगर लोणी काळभोर) या महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे 5730 रुपये किंमतीची 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच महिलेच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस पथक
शैलेश बलकवडे अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे पोलीस उपायुक्त , गुन्हे, राजेंद्र मुळीक सहाय्यक पोलीस आयुक्त 2 यांचे मार्गदर्शनाखाली वाहीद पठाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट-6 पुणे शहर, संभाजी सकटे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे या पथकाने केली.