क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News | पुणे : ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना 50 लाखांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश

पुणे, दि. १९ मे, महाराष्ट्र मिरर (मुबारक जिनेरी) Pune Crime news

महंमदवाडी रोड, वाडकर मळा येथील वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या सोनार दुकानावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना पुणे शहर गुन्हे शाखेकडून काही तासातच बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुणे शहरात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने पुणे पोलिसांमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे Crime DCP Amol Zende यांनी नॉनस्टॉप कारवाईचे सूत्रे हातात घेत आरोपींची धरपकड केल्याने पुणे पोलिसांची Pune Police प्रतिमा शाबूत राहिली आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर ACP Satish Govekar यांच्यासह, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर Sr.Pi. Pratap Mankar, अजय वाघमारे Sr.Pi. Ajay Waghmare, उल्हास कदम Sr.Pi. Ulhas Kadam, क्रांतीकुमार पाटील Sr.Pi. Krantikumar Patil यांनी दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, काल दि. १८ रोजी सकाळी १२ वा. च्या सुमारास महंमदवाडी रोड, वाडकर मळा येथील शफीउद्दीन शेख यांच्या बीजेएस या सराफा पेढीवर ६ ते ८ दरोडेखोरांनी बंदुकीसह दरोडा टाकून ५०० ग्राम सोने चोरले होते. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पुण्यात दिवसाढवळ्या दरोडा पडल्याने पुणे पोलिसांची प्रतिमा पुसट झाली होती. गुन्हे शाखेने आरोपींचा शोध घेण्यासाठी ५ पथके बनविली होती. यावेळी आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दरोडा टाकून अहमदनगरच्या दिशेने काहीकाळ पळ काढला व परत चाकण मुळशी कोथरूड परिसरात परतले. यावेळी सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी दुचाकीचा शोध घेत आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले.

आरोपी नामे १) सनी ऊर्फ योगेश हिरामण पवळे, वय २० वर्षे, रा. ए.आर.ए.आय. रोड, वसंतनगर, खडेकश्वर मित्र मंडळाजवळ, केळेवाडी, पौड रोड, कोथरुड, पुणे २) सनी ऊर्फ आदित्य राजु गाडे, वय १९ वर्षे रा. सदर ३) पियुष कल्पेश केदारी, वय १८ वर्षे, रा. स.नं. १०३, जयप्रकाश नगर, माऊली चौक, डॉन बॉस्को हायस्कुल समोर, येरवडा, पुणे ४) ओमकार ऊर्फ ओम्या जगन वाल्हेकर, वय १९ वर्षे, रा. जयभवानीनगर, कोथरुड, पुणे ५) नारायण ऊर्फ नारु बाळु गवळी, वय २० वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कोंढवा रोड, कात्रज, पुणे ६) मयुर चुन्नीलाल पटेल, वय ५३ वर्षे, रा. स.नं. १४, प्लॉट नं. ६, लोकरे बिल्डींग, फ्लॅट नं. १, कामधेनु पार्क शेजारी, वानवडी, पुणे ७) नासिर मेहमुद शेख, वय ३२ वर्षे, रा. घर नं. ३१६, चांभारवाडूर वानवडी, पुणे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यावेळी सुमारे 5० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

https://www.instagram.com/reel/C7JhMZDph6a/?igsh=MTdidnExb3BibTRkdA==

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0