Pune Crime News : संपत्तीचा वाद विकोपाला गेला; पुतण्याने केला चुलत्याचा खून

•पाषाण येथील घटना, संपतीच्या वादातून दोन्ही काका पुतण्यात वाद सुरू झाला, पुतण्याने काकावर धारदार शस्त्राने वार
पुणे :- पुण्यात पुन्हा एकदा काका पुतण्याचा वाद विकोपाला गेला आहे.घरगुती आणि संपत्तीच्या क्षुल्लक वादातून पुतण्याने काकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना पाषाण येथे घडली आहे. महेश तुपे असे मयत काकाचे नाव असून तर आरोपी शुभम महिंद्र तुपे हा चुलत पुतण्या असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
संपतीच्या वादातून काका पुतण्यात वाद सुरू झाला. अशात वाद विकोपाला गेल्याने पुतण्याने काकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना कोकाटे आळी विठ्ठल मंदिराजवळ पाषाण येथे घडली आहे. महेश तुपे यांचा मुलगा वरद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. शुभम महिंद्र तुपे (28 वय), रोहन सूर्यवंशी (19 वय), ओम बाळासाहेब निकम (20 वय) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संपूर्ण घटनेचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक ननावरे हे करत आहे.