क्राईम न्यूज

Pune Crime News : पर्वती पोलिसांची ‘हरवलेल्या मोबाईलची यशस्वी शोध’ मोहीम: 20 पुणेकरांना परत मिळाले त्यांचे ‘स्मार्ट’ साथीदार!

Pune Police Latest News : राज्यांच्या सीमा ओलांडून शोध; कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेशातूनही जप्त, पुणे पोलिसांचा देशाला आदर्श!

पुणे :- पर्वती पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत हरवलेले 20 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 6 लाख रुपये आहे. पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांनी पर्वती पोलिस ठाण्याचे Pune Police Station आणि पुणे शहर पोलिस दलाचे आभार मानले आहेत. Pune Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती पोलिस ठाण्याकडे मागील सहा महिन्यांपासून बाजारपेठेत आणि इतर ठिकाणी नागरिकांचे मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत, वरिष्ठांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एक विशेष पथक नेमण्यात आले. या पथकात पोलिस नाईक धायगुडे आणि पोलिस शिपाई खेडकर यांचा समावेश होता.

या पथकाने हरवलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच त्यामध्ये वापरले जात असलेल्या नवीन क्रमांकांचा मागोवा घेऊन थेट संपर्क साधला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून एकूण 20 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.

आज, दिनांक 26 जुलै 2025 रोजी, हे हरवलेले मोबाईल पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-3, पुणे शहर यांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. यामुळे मोबाईल गमावलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला आणि त्यांनी पुणे पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले.

सदरची ही कौतुकास्पद कारवाई पोलिस आयुक्त, पुणे शहर; अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग; राजेश बनसोडे, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-3 संभाजी कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त, सिंहगड विभाग,अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई खेडकर आणि पोलिस हवालदार धायगुडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुणे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

vivek

Recent Posts