Pune Crime News : गोळीबार करून पसार झालेला मोक्यातील आरोपी जेरबंद : वानवडी पोलीसांची कामगिरी
१० महिन्यापासून पोलिसांना देत होता गुंगारा
pune crime news
पुणे, दि. 12 एप्रिल, महाराष्ट्र मिरर :
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्यातील फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी मोहीम उघडली आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 आर राजा, सपोआ गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली वानवडी वपोनि संजय पतंगे, गुन्हे निरिक्षक करणकोट व तपास पथकाचे उपनि संतोष सोनवणे यांनी एका कारवाईत रामटेकडी हडपसर परिसरातून गोळीबार घटनेतील मोक्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या. Pune crime news
आरोपी अक्षय नागनाथ कांबळे, रा. ससाणेनगर, लेन नंबर १५, हडपसर पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोळीबार प्रकरणी दाखल झालेल्या मोक्याच्या गुन्ह्यात दहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपी अक्षय कांबळे बाबत वानवडी तपास पथकाचे पोलीस अंमलदार सरफराज देशमुख यांना गोपनिय माहिती मिळाली होती.
मिळालेल्या बातमीवरून वपोनि संजय पतंगे यांनी तपास पथकाचे प्रभारी उपनि संतोष सोनवणे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दि.०८/०४/२०२४ रोजी वानवडी पो.स्टे. गुन्हा रजि. नं. २५८/२०२३ भा.दं.वि. कलम ३०७,१२० (ब), २१२,१०८,१०९,२०१, ३४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ सह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम ३ (१) (ii), ३(२),३ (४) या गुन्हयातील पाहिजे आरोपी अक्षय नागनाथ कांबळे, रा. ससाणेनगर, लेन नंबर १५, हडपसर पुणे हा रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, रेल्वे अंडरबायपास जवळ, रामटेकडी, हडपसर पुणे येथे कोणाचीतरी वाट पहात थांबलेला असताना तपास पथकातील पोलीस हवालदार सर्फराज देशमुख, हरिदास कदम, महेश गाढवे, पोलीस अंमलदार यतिन भोसले, गोपाल मदने, विष्णू सुतार यांनी आरोपी नामे अक्षय नागनाथ कांबळे यास शिताफिने ताब्यात घेवून त्यास अटक केली.
सदरची Pune Police कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर आर राजा, व सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक गुन्हे राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उप निरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, यतिन भोसले, गोपाल मदने विष्णु सुतार, अमोल गायकवाड, संदिप साळवे, यांनी केली आहे.