क्राईम न्यूज

Pune Crime News | नांदेडसिटी : दारूच्या नशेत पेंटरचा खून : पसार झालेल्या मारेकऱ्यांना २ तासात अटक

nandedcity police station

  • पोलीस अंमलदार शिवा क्षीरसागर यांच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

पुणे, दि. ३० जुलै, महाराष्ट्र मिरर
Mubarak Jineri | Pune Crime News, Pune News, Nandedcity police

मोबाईलच्या किरकोळ वादातून पेंटिंग काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेडसिटी हद्दीत घडली आहे. खून करून पसार झालेल्या मारेकऱ्यांना पोलीस अंमलदार शिवा क्षीरसागर यांच्या सतर्कतेने २ तासात पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

साई धाम, प्रभात प्रेस रोड, धायरी या ठिकाणी देवा उर्फ देविदास पालते याचा खून झाला आहे.

दि. २९ रोजी नांदेडसिटी पोलिसांना देवा उर्फ देविदास पालते हा जखमी असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी पोलीस अंमलदार शिवा क्षीरसागर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी देवा पालते व आरोपी यांची प्राथमिक चौकशी करत वरिष्ठाना माहिती दिली. यावेळी रुग्णालयात दाखल करताच जखमी देवा पालते याला मयत घोषित करण्यात आले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या सूचनेनुसार तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रतिक मोरे, भीमराज गांगुर्डे, स्वप्नील मगर, शिव क्षीरसागर, राजू वेंगरे आरोपीना शिफातीने ताब्यात घेतले. संशयित आरोपी गजानन राठोड, दिनेश राठोड, महारुद्र गवते अशी आरोपींची नावे आहेत. मोबाईलच्या वादातून खून झाल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

याबाबत नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुरन १५८/२०२५ बीएनएस १०३(१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Maharashtra Mirror

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago