•दीड वर्षांपूर्वीच्या खुनातील आरोपीचा डाव उधळला; 40 हजारांचे गावठी पिस्तूल जप्त
पुणे :- ‘खुनाचा बदला पिस्तुलानेच!’ या इराद्याने पुण्यात दहशत माजवत फिरणाऱ्या एका कुख्यात आरोपीला पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने फिल्मी स्टाईलने पकडले आहे. दीड वर्षांपूर्वी एका खुनात सामील असलेला हा आरोपी शहराच्या मध्यवर्ती भागात गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा थरारक पाठलाग करून त्याला जेरबंद केले.
काय आहे नेमका प्रकार?
22 सप्टेंबर रोजी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून धक्कादायक माहिती मिळाली. दीड वर्षापूर्वीच्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी, ईश्वर प्रशांत तुपसुंदर (वय 22) हा कसबा पेठ परिसरात गावठी पिस्तूल घेऊन फिरत असून, तो दहशत निर्माण करण्याच्या तयारीत आहे. ही माहिती मिळताच पोलिसांच्या अंगावर काटा आला.
पिस्तूल घेऊन फिरायला लागला
पोलिसांनी तात्काळ त्याला शोधण्यासाठी मोहीम सुरू केली. आरोपीच्या वर्णनानुसार पोलीस त्याचा शोध घेत असताना, तो एका गल्लीतून संशयास्पद अवस्थेत जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. ही पिस्तूल घेऊन तो नक्की काय करणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.पुणे शहर पोलिसांचे अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या टीमने ही थरारक कारवाई यशस्वी केली.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…