Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावणारे ताब्यात : २ लाखांचा मुद्देमाल जप्त : चतुशृंगी पोलिसांची कामगिरी
- वपोनि महेश बोळकोटगी यांच्याकडून कारवायांचा सपाटा
पुणे, दि. १५ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News
शिवनेरी पार्क लेन, गणराज अपार्टमेंट येथे वयोवृद्ध महिला तिच्या नातेसह जात असताना दुचाकीवरून येणाऱ्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी केली होती. सदर गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करत दोघा चोरट्यांना चतुशृंगी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
संशयित १) संजय रमेश बाबरे, वय 29 वर्ष, रा. मु पो लोणी बुद्रुक, हसनापुर रोड, विखे वस्ती, ता. राहता, जि. अहमदनगर व २) राहुल रमेश मावस, वय 24 वर्ष, रा. मु. नादी, पो. वीरगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर दोघांना सापळा कारवाई करत बालेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
चतुशृंगी पोलीस स्टेशन कडील गु र क्र ७३७/२०२४ भा न्या सं कलम ३०९(४),३(५) या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे तपास करत असताना सपोनी नरेंद्र पाटील व पो शि भांगले यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व गोपनीय बातमीदाराकडून माहिती काढून सदरचा गुन्हा हा संजय बाबरे व राहुल मावस यांनी केला असून ते बालेवाडी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आल्या बाबत माहिती मिळवली होती.
आरोपींना गुन्ह्यांमध्ये अटक करून पोलीस कस्टडी दरम्यान आरोपींकडून त्यांनी जबरी चोरी केलेले एक लाख रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्हा करताना वापरलेली एक लाख रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण २,००,०००/- रु कि चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल ही देखील चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने येवला तालुका पोलीस स्टेशन, नाशिक ग्रामीण, गु. नों. क्र. २१०/२०२४ भा द वि कलम ३७९ हा वाहन चोरीचा गुन्हा देखील उघड करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी चतुशृंगी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, विजयानंद पाटील, स. पो. नि. नरेंद्र पाटील व तपास पथकातील अंमलदार पो हवा दुशिंग, पो हवा दुर्गे, पो शि भांगले,पो शि खरात, पो शि तरंगे यांनी केली आहे.