Pune Latest Crime News : 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीने पीडितेसोबत काढला सेल्फी,तोंडावर स्प्रे मारून अत्याचार
पुणे | पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवारी रात्री एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीवर डिलिव्हरी बॉयच्या वेशात आलेल्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे शहर हादरले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. Pune Latest Crime News
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी तरुणाने डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून सोसायटीत प्रवेश केला. तो पीडित तरुणीच्या घरी जाऊन ‘कुरिअर आलं आहे’ असं सांगू लागला. पीडितेने स्पष्ट केल्यानंतरही “सही करावी लागेल” असा दबाव टाकताच तिने सेफ्टी डोअर उघडले. त्या क्षणीच आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे फवारला आणि बेशुद्ध अवस्थेत लैंगिक अत्याचार केला.
घटनेनंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईल फोनवर सेल्फी काढला आणि “परत येईल” असा मजकूर टाईप करून ठेवला. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
कोंढवा पोलिसांनी Kondhwa Police Station या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पथके तातडीने रवाना केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…