Pune Crime News : कोंढवा : हुक्का पार्लरवर धाड, 5 जण ताब्यात
•कोंढवा पोलिसांनी बेकायदेशीर हुक्का पार्लर वर कारवाई
पुणे :- कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एनआयबीएम रोड येथील द व्हिलेज हॉटेल येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लर वर कारवाई करण्यात आली आहे.यात पाच जणांना ताब्यात घेतले असून विविध फ्लेवरचे तंबाखू जन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुण्यात हुक्का पार्लर धंदा तेजीत असून पोलिसही कारवाई करत असतात.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर चालू असणाऱ्या अवैध धंद्याचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांचे कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 29 ऑगस्टच्या रात्री पोलीस गस्ती घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे आणि ठाणे पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना बेकायदेशीर व चोरून चालू असणाऱ्या अवैध धंद्याचा शोध घेत होते.त्यांच्या गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली होती की, एन आय बी एम रोड येथील द व्हिलेज हॉटेल मध्ये ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पिण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी छापा टाकून पाच जणांना अटक केली आहे. यामध्ये हॉटेल चालक आणि इतर कर्मचारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी छापेमारीत 23 हजार पाचशे रुपये रुपयाचा तंबाखूजन्य हुक्काचे फ्लेवर व नऊ काचेचे हुक्काचे पोट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमन 2018 चे कलम 4 (अ),21(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपींची नावे
1.द व्हिलेज हॉटेलचे चालक बाकिर रमेश बागवे, (36 वर्ष, रा भवानी पेठ पुणे समोर, पुणे)
2.हरुन नबी शेख,( 25 वर्ष, रा. जि नोदीया, पश्चिम बंगाल)
3.बिक्रम साधन शेख, (20 वर्ष)
4.अमानत अन्वर मंडळ, (22 वर्ष)
5.अमानत अन्वर.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त परि.05 आर राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग (अतिरिक्त कार्यभार) अश्विनी राख, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंगलदार अक्षय शेंडगे, राहुल थोरात, सुहास मोरे, प्रदिप बेडिस्कर यांनी केली आहे.