पुणे

Pune Crime News : काळेपडळ पोलीस ठाण्याची पहिलीच मोठी कारवाई, अवैध हातभट्टी दारू उद्ध्वस्त

•काळेपडळ पोलिसांची पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करणारे भट्टी आणि त्यामध्ये हातभट्टी दारू असा एकूण 3,045 लिटर गावठी दारू गाडीसह जप्त

पुणे :- पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नव्याने स्थापित झालेले काळेपडळ पोलीस ठाण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.”

राज्यात विधानसभा निवडणुका-2024 च्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचासंहिताच्या दरम्यान पुणे शहरात अवैध धंदे वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अधिकारी आणि अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

24 ऑक्टोबर रोजी काळेपडळ तपास पथकातीत अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस हवालदार, संजय देसाई, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार परशुराम पिसे, पोलीस हवालदार अमोल काटकर, महिला पोलीस नाईक स्नेहल जाधव, पोलीस शिपाई महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार , सद्दाम तांबोळी, पोलीस शिपाई गणेश माने, श्रीकृष्ण खोकले असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना गोपनीय बातमी मिळाली की, संतोषनगर, कंजारभट, महंमदवाडी रोड पुणे येथे सचिन कचरावत व मानेश कचरावत हे दोघे मिळून त्याचे राहते घरापाठीमागे या ठिकाणी गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहीत्य गोळा करुन, दारु काढणेची भट्टी लावून, गावठी हातभट्टी दारु गाळण्याचे तयारीत आहेत. त्याप्रमाणे‌ मिळालेल्या बातमीच्या आधारे मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे पोलीस पथक यांनी संतोषनगर, कंजारमट, महंमदवाडी रोड पुणे येथे सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकून कारवाई केली. छापा कारवाईमध्ये दारु गाळणारे दोन व्यक्तींना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव सतिश प्रकाश कचरावत, (43 वय, रा. संतोषनगर, कंजारभट वस्ती, तरवडेवस्ती, महंमदवाडी, पुणे),मानेश प्रकाश कचरावत, (35 वय) असे असल्याचे सांगितले. ठिकाणावरुन तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले एकुण 87 कॅन व चार चाकी स्विफ्ट गाडी कार असा एकुण 8 लाख 72 हजार रु.किं.चा मुद्देमाल पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे.

पोलीस पथक
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 5 यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक, संजय गायकवाड, पोलीस उप निरीक्षक प्रशांत लटपटे, पोलीस हवालदार, संजय देसाई, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार परशुराम पिसे, पोलीस हवालदार अमोल काटकर, महिला पोलीस नाईक स्नेहल जाधव, पोलीस शिपाई महादेव शिंदे, पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, पोलीस अंमलदार , सद्दाम तांबोळी, पोलीस शिपाई गणेश माने, श्रीकृष्ण खोकले यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0