क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

Pune Police Arrested Robbers : शहरात लॅपटॉप चोरी करणाऱ्या सराईत टोळीच्या विरोधात 11 गुन्ह्याची उकल

पुणे :- गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्वारगेट पोलिसांनी Swargate Police गजाआड गेले आहे. पोलिसांनी आरोपींच्या Pune Police Station विरोधात असलेल्या 11 गुन्ह्यांचे उकल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी रोडच्या कडेला लॉक व पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचे गाडीची काच फोडुन कंपनीचा लॅपटॉप, ॲपल कंपनीचा एअर पॉड असलेली बॅग चोरी करून तिथून पसार झाले होते. त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्याच्या भारतीय न्याय संहिता कलम 303(2),324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Pune Police Latest News

स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,युवराज नांद्रे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यामधील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार यांचे मदतीने गुन्हयातील लॅपटॉपचा शोध घेतला असता लॅपटॉपचे लोकेशन बैंगलोर याठिकाणाचे आल्याने लागलीच बेंगलोर पोलीस यांना संपर्क करुन व्यक्ती ताब्यात घेण्यारा सांगितल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले होते. त्यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी वरिष्ठांची परवानगी घेवुन तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना बेंगलोर येथे रवाना केले होते. Pune Police Latest News

बेंगलोर येथे जावुन सुरेश कुमार पांडुरंगन सेरवई (50 वय रा. त्रिचापल्ली तामिळनाडु ) यास ठिकाणाहून दोन लॅपटॉप पुढील तपाससाठी ताब्यात घेवुन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे घेवुन आले आहे.आरोपी‌ दाखल गुन्ह्यात अटक करुन पोलीस कोठडी दरम्यान त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे 2 साथीदारांसह मिळुन पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस रटेशन हद्दीमध्ये एकुण 11 वाहनांच्या काचा फोडुन 11 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दाखल गुन्हयातील एकुण 1.50 लाख ॲपल कंपनीचा व डेल कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. Pune Police Latest News

पोलीस पथक

अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ -2 पुणे स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार मोदुर्गे, तनपुरे, मोराळे, लाहीगुडे, घुले, शेख, पवार, चव्हाण, खंदाड, टोणपे, शिंदे व दुधे यांनी केली आहे. Pune Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0