क्राईम न्यूजWeb storiesपुणे
Trending

Pune Crime News | कोलवडी येथे घरफोडी करणारा सराईत महेश चव्हाण जेरबंद

  • गुन्हे शाखा युनिट ६ कडून कारवाई

पुणे, दि. ११ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News

कोलवडी, कोंढवा, वानवडी, चंदननगर, हडपसर व भारती विदयापीठ परिसरात घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल असणारा सराईत गुन्हेगार महेश चव्हाण याला गुन्हे शाखा युनिट-६ कडून शिफातीने ताब्यात घेण्यात आले आहे. कोलवडी येथील घरफोडी प्रकरणी तपास करताना गुन्हे शाखेकडून सराईत महेश चव्हाण याला जेरबंद करण्यात आले आहे. सदर कारवाई गुन्हे उपायुक्त अमोल झेंडे DCP Amol Zende, सपोआ सतीश गोवेकर ACP 2 Satish Govekar, सपोआ गणेश इंगळे ACP 1 Ganesh Ingale यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६ चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण Pi Pratap Poman व पथकाने केली आहे.

महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण वय १९ वर्षे रा. कॅनॉलजवळ, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

दिनांक १० रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे PN Nitin Mundhe यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार नामे महेश चव्हाण हा आव्हाळवाडी गावचे हददीत निळकंठेश्वर मंदिराजवळ, मोकळया मैदानात, आव्हाळवाडी येथे थांबलेला आहे. मिळालेल्या बातमीवरून युनिट-६ वपोनि प्रताप पोमण यांनी पथकाला कारवाईसाठी आदेश दिले होते. बातमीच्या ठिकाणी महेश चव्हाण हा संशयीतरीत्या थांबलेला होता. पोलिसांना पाहुन तो पळुन जावु लागल्याने त्यास शिताफीने ताब्यात आले. अंगझडती दरम्यान त्याचे खिशात सोन्याचे दागिने मिळून आले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे इतर साथिदारांसह कोलवडी व कोंढवा परिसरात घरफोडी चोरी केल्याचे कबूल केले. सदरबाबत अभिलेख तपासले असता वर नमूद आरोपीकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

१) लोणीकंद पोलीस स्टेशन गु र नं ७१३/२०२४ भा न्या सं कलम ३०५ (अ), ३३१ (४) २) कोंढवा पोलीस स्टेशन गु र नं ९५५/२०२४ भा न्या सं कलम ३०५, ३३१ (४)

आरोपीकडून दोन्ही गुन्हयातील ३४.५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण २,४५,०००/- रु किं चा मुददेमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे. आरोपी महेश ऊर्फ महया काशिनाथ चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी वानवडी, चंदननगर, हडपसर, भारती विदयापीठ या पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी व वाहनचोरी सारखे असे एकुण २० गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी Pune Police पोलीस आयुक्त युक्त पुणे शहर अमितेश कुमार, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, समीर पिलाने, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Via
maharashtra mirror
Source
maharashtra mirror

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0