पुणे

Pune Crime News : वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक; आठ दुचाकी हस्तगत

•याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पुणे :- एकिकडे वाहनचोरीचे सत्र पुणे शहरात सुरू असताना रस्त्यावरून पार्क केलेली मोटरसायकल मोठया शिताफीने चोरून नेणा-या सराईत चोरटयाला कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे. अक्षय अंबादास ढावरे (28 वय रा. शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 8 दुचाकी असा 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, यांनी सुचना दिल्या होत्या.त्या सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथकाचे पोलीस हवालदार निलेश देसाई व गोरखनाथ चिनके हे सीसीटीव्ही फुटेज चेक करीत असताना संशयित वाहन चोरीतील आरोपी त्यांनी निष्पन्न केला. संशयित आरोपी हा शिवनेरीनगर येथील पारसी ग्राऊंडच्या बाजुस मोकळ्या ठिकाणी नेहमी येत असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांचे एक पथक सापळा रचून या सराईत ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवून आरोपी अक्षय ढावरे याला ताब्यात घेतले आहे पोलिसांनी आरोपीची सकल चौकशी केल्यानंतर आरोपीने आत्तापर्यंत 5 ॲक्टिव्हा, 1 ज्युपिटर,1पल्सर,1डिओ असं चोरी केल्याचा माल जोपर्यंत गाडीला ग्राहक मिळत नाही तोपर्यंत तो लपवून ठेवण्याचे पोलिसांना सांगितले आहे. 2.35 लाख किंमतीच्या आठ मोटरसायकल पोलिसांनी जप्त करून पोलिसांनी आरोपीकडून आठ गुन्हे उघडकीस आणली आहे.

पोलीस पथक
अमितेशकुमार पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-05, धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अब्दुल रौफ शेख पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेनाणे, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन, राहुल थोरात, विकास मरगळे या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0