पुणे

Pune Crime News : पिंपरीतील गोळीबार प्रकरणी सराईत गुन्हेगार रवींद्र घारे अटक; 25 गंभीर गुन्ह्यांचा इतिहास

•गँगस्टर रवी व सुरेश पुजारी यांच्याशी संबंध; पिस्तुल, काडतुसे व दोन दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड :- पिंपरीतील व्यावसायिकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मालमत्ता विरोधी पथकाने सराईत गुन्हेगार रवींद्र भाऊसाहेब घारे याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी पिंपरीत भरदिवसा व्यावसायिकाची सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार झाल्याने घारेने त्याच्या पायावर गोळी झाडली होती. या प्रकारामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडाली होती.

रवींद्र घारे हा कुख्यात गँगस्टर रवी पुजारी आणि सुरेश पुजारी यांच्या टोळीशी संबंधित असून त्याच्यावर 25 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात एक हत्या आणि सहा गोळीबारांच्या घटनांचा समावेश आहे. अलीकडेच नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकावरील गोळीबारप्रकरणी आणि मोक्का अंतर्गत तो फरार होता.

घारेने हेल्मेट आणि रेनकोट घालून गुन्हा केल्याने तपासात अडथळे आले, मात्र सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अटक करताना पोलिसांनी त्याच्याकडून 1 पिस्तुल, 11 जिवंत काडतुसे आणि दोन दुचाकी जप्त केल्या.

ही कारवाई सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या पथकाने केली.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago