Pune crime news | घरफोडी व दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद : गुन्हे शाखा युनिट ५ व ६ संयुक्त कामगिरी
पुणे, दि. 12 मार्च, महाराष्ट्र मिरर : Pune Crime News
वानवडी व हडपसर परिसरात घरफोडी व दुचाकी चोरीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या युनिट 5 व 6 कडून ताब्यात घेण्यात आला आहे. चोरीचा मुद्देमाल विक्री करण्याचा प्रयत्नात असलेल्या आरोपीला फुरसुंगी परिसरातून जेरबंद करण्यात आले. सराईत गुन्हेगाराकडून तब्बल 9 गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.
निहालसिंग मन्नुसिंग टाक उर्फ शिखलकर, वय १९ वर्षे, रा. स.नं. ४, तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. Pune Crime News
गुन्हे शाखेकडील युनिट-५ व युनिट-६ कडील अधिकारी व अंमलदार असे दि. ११/०३/२०२४ रोजी हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना पथकातील पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर व नितीन मुंढे यांना चोरट्याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती.
सदर बातमीच्या अनुषंगाने युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी सोबतच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचेसह बातमीच्या ठिकाणी चंदवाडी रोड फुरसुंगी दत्त मंदिराजवळ चोरटा दिसून आला.
पोलीसांना पाहताच चोरट्याने मोटार सायकलसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यास पोलीसांनी शिताफीने मोटार सायकलसह ताब्यात घेतले.
त्याचेकडील ताब्यातील मोटार सायकलबाबत माहिती घेता ती हडपसर पोलीस ठाणे येथील चोरीच्या गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन सदर इसमाकडे पोलीसांनी कोशल्यपुर्ण तपास करुन त्याने त्याचे इतर साथीदारासह वानवडी व वडकी भागात दोन घरफोडी चोरी केल्याचे सांगुन पुणे शहरात विविध ठिकाणी मोबाईल जबरी चोरी, वाहन चोरी व मोबाईल चोरी असे एकुण ०९ गुन्हे केल्याचे सांगुन एकुण ०४ मोटर सायकली, ०४ मोबाईल फोन व विदेशी चलन असा एकुण २,६८,७५०/-कि. चा ऐवज जप्त करणेत आला.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेंद्र बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, अकबर शेख, दया शेगर, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, ऋषिकेश ताकवणे, शेखर काटे, प्रतिक लाहीगुडे, पांडुरंग कांबळे, संजय दळवी, स्वाती गावडे यांनी केलेली आहे.