
Baramati Ajit Pawar News : लाखोंच्या जनसमुदायाचा ‘एकच वादा, अजितदादा’चा जयघोष; चौथऱ्यावर पार्थिव येताच कार्यकर्त्यांचा आक्रोश
बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे पर्व, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आज अनंतात विलीन झाले. ज्या बारामतीला त्यांनी आपल्या कष्टाने आणि दूरदृष्टीने नंदनवन बनवले, त्याच बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आज लाखोंच्या साक्षीनं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेला अलोट जनसमुदाय आणि समर्थकांच्या साश्रू नयनांनी आज बारामतीची माती भिजली होती.
मैदानावर जनसागराचा महापूर अजितदादांची अंत्ययात्रा जेव्हा विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात पोहोचली, तेव्हा तिथे पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातूनही त्यांचे समर्थक पहाटेपासूनच दाखल झाले होते. कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचे दर्शन घेण्यासाठी झाडांवर, इमारतींच्या गच्चीवर आणि मैदानाच्या कडेला गर्दी केली होती.
फोटो गॅलरी


















