Pune Crime News : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या; शिवाजीनगर पोलिसांची कारवाई
•सराईत आरोपीच्या विरोधात सहा गुन्हे दाखल
पुणे :- सराईत गुन्हेगाराने बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ससाने नगर येथील नाना नानी पार्क जवळील असलेल्या सुलभ शौचालय परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
अंबाजी कल्याणजी शिंगे (24 वर्ष, रा. ससाने नगर हडपसर पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अंबाजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर चोरी, खुनाचा आणि दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, गुन्हेगार पार्श्वभूमी असल्याने तो स्वतः जवळ पिस्तूल बाळगत होता.त्याला कोणी पिस्तूल दिले याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव पोलीस हवालदार साठे, पवार, चव्हाण, जाधव पोलीस नाईक जाधव, सांगवे आणि वलटे त्यांच्या पथकाने केली आहे.
शिवाजीनगर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना माहिती मिळाली की, नाना नानी पार्क जवळ असलेल्या सुलभ शौचालय जवळ एकजण पिस्तूल घेऊन उभा आहे.
पथकाने सापळा रचून संशयिताला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवर एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. सराईत गुन्हेगार अंबाजी शिंगे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याने पिस्तूल कोणाकडून आणले, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियमन सन 1951 चे 27 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या विरोधात वानवडी,मुंढवा, हडपसर, सासवड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त जनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त संदिप गिल, सह पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव, पोलीस हवालदार दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, अतुल साठे ,राजकिरण पवार, सचिन जाधव, पोलीस नाईक महावीर वलटे पोलीस शिपाई श्रीकृष्ण सांगवे यांनी केली आहे.