Pune Crime News : गावठी कट्टा बाळगणाऱ्यास कर्वेनगरमधून अटक; जिवंत काडतूसे हस्तगत
![](https://maharashtramirror.com/wp-content/uploads/2025/02/29c2107a-204d-4600-9741-9c6e464d606f-780x470.jpeg)
Pune Latest Crime News : गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे पुणे जिल्ह्यातील कर्वेनगर येथून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे
पुणे :- गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसेसह पुणे जिल्ह्यातील कर्वेनगर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Pune Crime News कुणाल सचिन घावरे (वय 28 रा.नानासाहेब बराटे कॉलनी लेन नं 1 कर्वेनगर पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विश्वजित काईगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे Marwadi Police Station व रंगराव पवार पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-3 यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-3 कडील अंमलदार वारजे माळवाडी पोलीस ठाणे हददीत घडणारे गंभीर गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पेट्रोलींग करीत होते.पोलीस अंमलदार प्रतिक मोरे यांना बातमी मिळाली की, एक व्यक्ती हा डी.पी रोड कर्वेनगर पुणे येथे रोडवर धावलेला असुन त्याच्याकडे पिस्टल आहे. अशी त्याचे वर्णनासह बातमी मिळाल्याने वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांचेसह युनीट-3 कडील अंमलदार यांनी त्या ठिकाणी जावून बातमीतील वर्णनाचे व्यक्तीचा शोध घेतला एक संशयीत रित्या हालचाल करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव कुणाल सचिन घावरे (वय 28 रा. नानासाहेब बराटे कॉलनी लेन नं 1 कर्वेनगर पुणे) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेता त्याच्याकडून 41 हजार रुपयांचे देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व दोन पिवळया धातुचे दोन काडतुसे मिळुन आले ते पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे यांनी जप्त करून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाणे गुन्हा आरोपी कुणाल याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधि कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस अधि कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. अग्नीशस्त्र कोठुन आणले व कशासाठी जवळ बाळगले याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे वारजे माळवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.