पुणे

Pune Crime News : कोंढव्यात हत्यार घेऊन टोळक्याचा धुडगूस ; वाहनांची तोडफोड वर्चस्व वादावरून घटना

•कोंढवा परिसरात गोंधळ घालणारे आणि दहशत माजवणारे गजाआड, टोळक्यातील सात आरोपींना अटक

पुणे :- “बीच में आने का नहीं एक-एक को खलास कर दूंगा”…कोंढव्यातील लक्ष्मीनगर आणि अश्रफनगर येथे तब्बल 21 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी 6 जणांच्या टोळक्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.16 एप्रिलला पहाटे साडेचारच्या सुमारास घराच्या बाहेर मोठ्याने काचा फोडल्यासारखा आवाज आला.

त्यामुळे ते घराच्या खिडकीजवळ आले असता पाच ते सहा जणांचे टोळके तेथे आले होते. त्यांच्या हातात विविध हत्यारे होती अन् त्या हत्यारांच्या साह्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून ते वाहने तोडफोड करत होती. शिवीगाळ करत टोळके लोकांना धमकवत होते. तसेच कोणी मध्ये आल्यास खल्लास करण्याबाबत ते बोलून दहशत पसरावत होते.

या हत्यारधाऱ्यांमुळे कोणीही नागरिक घराबाहेर आले नाही. नंतर हे टोळके आठ दुचाकी फोडून भगवा चौकाच्या दिशेने गेले. तेथे त्यांनी प्रतिभाताई शाळेजवळ अश्रफनगर येथील गल्ली नंबर 7 येथे पार्क केलेल्या तब्बल 13 चारचाकी-तीनचाकी गाड्या फोडून त्याचे नुकसान केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या टोळक्याच्या शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेच्या मदतीने सात आरोपींना अटक केली असून आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीकडून वाहने आणि हत्यारे जप्त केले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

1.शाहीद रहीम शेख,
2.रिहान हारून शेख,
3.सोहेल जम्मालुद्दीन काझी
4.नवाज अजीज शेख
5.अल्फाज मुर्तजा बागवान
6.यश विजय सारडा
7.अमन कबीर इनामदार

पोलीस पथक
अमितेशकुमार पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-05, धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अब्दुल रौफ शेख पोलीस निरीक्षक (गुन्हे), नवनाथ जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेनाणे, गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे, अभिजीत जाधव, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, सुजित मदन, राहुल थोरात, विकास मरगळे या पथकाने केली आहे.

vivek

Recent Posts