Pune Latest Crime News: गोळीबार प्रकरणात फरार असलेलाही गजाआड; 4 पिस्तुलं, 34 जिवंत काडतुसे व गाडी जप्त
पुणे | पुण्यातील दोन टोळ्यांतील संघर्षातून उभ्या राहिलेल्या खूनाच्या कटाचा कोतवाली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पुण्यात गोळीबार Pune firing Criminal करून फरार झालेल्या एकासह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून 4 पिस्तुलं, 34 जिवंत काडतुसे, तीन मोबाईल आणि एक स्विफ्ट कार असा सुमारे 8 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Pune latest Crime News
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोतवालीचे निरीक्षक प्रताप दराडे आदी अधिकारी उपस्थित होते.
अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे रोहन राजू गाडे (30 वय, बिबवेवाडी, पुणे) आणि नवनाथ अंकुश ढेणे (29 वय, वारजे माळवाडी, पुणे) हे आहेत. रोहन गाडे हा 18 मे रोजी पुण्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात फरार होता. या प्रकरणात अमित लकडे या तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यामागे बापू नायर टोळीतील स्वप्निल गुळवे (चॉकलेट) याने माहिती दिल्याचा संशय गाडे याला होता.
या संशयातून स्वप्निल गुळवेच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. यासाठी आरोपींनी थेट मध्य प्रदेशातील उमरटी येथे जाऊन शस्त्र आणि काडतुसे आणली होती. हे दोघे नगर शहरातून पुण्याकडे येणार असल्याची गुप्त माहिती निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळताच, त्यांनी पथकासह स्टेशन रस्त्यावरील क्लेरा ब्रुस शाळेजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून 4 पिस्तुलं, 2 मॅगझिन, 34 जिवंत काडतुसे, तीन मोबाईल आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 8 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यात रोहन गाडेच्या टोळीतील सहा जण आधीच तुरुंगात आहेत. त्यांच्या मार्फतच हा कट रचल्याची कबुली या दोघांनी दिल्याचं एसपी घार्गे यांनी स्पष्ट केलं.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोतवालीचे निरीक्षक प्रताप दराडे आदी अधिकारी उपस्थित होते.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…