Pune Crime News : जमिनीच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या
Pune Crime News Kondhwa Police Arrested Criminal In 24 Hours : कोंढवा पोलीसांनकडुन आरोपीस 24 तासात अटक,भागीदारीत खरेदी केलेली जमीन नावावर करुन देण्यास विरोध केल्याने मित्रानेच मित्राचा निघृण खून
पुणे :- जमिनीच्या वादातून मित्रानेच केले मित्रानेच केली मित्रांची निघृण हत्या केली आहे.17 एप्रिल रोजी रहेजा स्टरलिंग फेज 6 क्लाऊड 9 सोसायटी मधील चालु बाधंकाम सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रेशर टकमध्ये पंकजकुमार मोती कश्यप, (35 वर्षे), महंमदवाडी पुणे हा सुपरवायझर काम करणारा व्यक्ती पडुन मयत झाला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पंरतु घटनास्थळवर पोलीसांनी भेट दिली असता सदर इसम हा पडुन मयत झाला नसुन त्याचा पाचव्या मजल्यावरील चालु बाधंकामाच्या फ्लॅटमध्ये पुर्ण शरिरावर धारधार हत्याराने ठिकठिकाणी भोकसुन त्याच्या पोटावर वार करुन त्याची आतडी बाहेर काढून खुन केल्याचे व खुन करुन रक्ताचे डाग मातीने झाकुन त्याची बॉडी प्रेशर डक मध्ये टाकुन दिल्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा भादवि कलम 302 प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. Pune Crime News
वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देवुन व घटनेचे गांर्मीय पहाता आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिंगोळे व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते. घटनास्थळावरील मजुरांना मयत इसमांबाबत विचारणा करता त्याचे नाव पंकजकुमार मोती कश्यप रा. मुळ उत्तरप्रदेश हा असल्याचे समजले तो रहेजा कन्स्ट्रकशन च्या लेबर कॅम्पमध्ये रहावयास असुन तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम पहातो. अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली त्यावरून अधिक तांत्रिक तपासात मयतास घटनास्थळी कोणीतरी बोलावुन घेतल्याचे निष्पन्न झाले. बोलावुन घेणाया संशयीतापैकी एक राज उर्फ सुरेश मनीराम आर्या हा खुनाच्या रात्रीच आणखी काही मजुरांसमवेत उत्तरप्रदेश येथे पळुन गेल्याचे समजले लागलीच एक पथक उत्तरप्रदेश येथे आरोपीचा माग घेण्यासाठी रवाना करण्यात आले. Pune Crime News
मजुरांकडे चौकशी दरम्यान व नातेवाईकांचा शोध घेवून मयत इसम हा आरोपी राज उर्फ सुरेश मनीराम आर्यों, (34 वर्षे) ( सध्या रा.महंमदवाडी पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश ) याच्या सोबत पुर्वी काम करित असताना दोघांनी मिळून मुळगावी उत्तप्रदेश येथे एकत्रित जमीन खरेदी केली असल्याचे व ती जमीन मयत पंकजकुमार मोती कश्यप याच्या नावावर असुन ती तो सुरेश आर्या यास नावावर करुन देण्यास विरोध करित असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाले होते अशी माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषण करून तसेच साईटच्या बाहेरिल रोडवरील 42 सीसीटिव्हि फुटेजची पाहणी केली असता आरोपी याच्या सोबत भोलानाथ राजाराम आर्या, (26 वर्षे) सध्या रा. रहेजा व्हिस्टा लेबर कॅम्प, पुणे रा.मुळ रा. उत्तरप्रदेश हा त्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी तिन पथके तयार करून शोध कार्य सुरू केले. अधिक चौकशी करता आरोपी भोलानाथ हा पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी लेबर कॅम्पमध्येच थांबुन असल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता नमुदचा गुन्हा आरोपी सुरेश याच्या सोबत केल्याचे कबुल केले तसेच दुसरा आरोपी राज उर्फ सुरेश मनीराम आर्या, (34 वर्षे), (सध्या रा. महंमदवाडी पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश) हा त्याच्या मुळगावी घोरमा परसिया, उत्तरप्रदेश येथे पळुन गेल्याने तत्पूर्वीच पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळ यांच्याबरोबर एक पथक उत्तर प्रदेश येथे आरोपीच्या मुळगावी पाठवुन त्याची वाट पहात दबा धरून बसले त्यांनी स्थानिक पोलीसाच्या मदतीने सदर आरोपी हा त्याच्या घरी पोहचण्याच्या अगोदरच त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यानेही त्याचा साथीदार नातेवाईक (दाजी) भोलानाथ राजाराम आर्या, यांच्या मदतीने खुन केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसताना पोलीसांनी तांत्रिक कौशल्य तसेच अथक मेहनीतीने परिश्रम करून आरोपीतांना चोविस तासाच्या आत जेरबंद केले, सदर गुन्हयाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे करित आहेत. Pune Crime News
पोलीस पथक
अमितेशकुमार पोलीस आयुक्त (Pune CP Amitesh Kumar) , मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्वे प्रादेशिक विभाग,आर राजा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 05 गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उप निरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार अमोल हिरवे,निलेश देसाई, पोलीस शिपाई शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, अभिजीत जाधव, संतोष बनसुडे, गणेश चिंचकर, राहुल रासमे,अक्षय शेंडगे, जयदेव भोसले, विकास मरगळे, शशांक खाडे, रोहित पाटील, पोलीस शिपाई राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, सुरज शुक्ला, सुजित मदन, यांनी केली आहे.