क्राईम न्यूज

Pune Crime News : “तुला जिवंत ठेवणार नाही!” म्हणत पोलिसांवर गोळीबार — पुण्याचा अटटी शेख चकमकीत ठार

Pune Latest News : मोक्का, खंडणी, खूनाचा प्रयत्न अशा 15 गुन्ह्यांत वॉंटेड असलेला अटटी शेख पोलिसांना रोखून म्हणाला, “आज तुम्हाराच खेल खल्लास!”

पुणे | पुणे शहरातील गँगस्टर टोळीतील कुख्यात गुन्हेगार शाहरुख ऊर्फ अटटी शेख (वय अंदाजे 30, रा. सय्यदनगर, हडपसर) याचा थरारक पोलिस कारवाईत गोळीबारात मृत्यू झाला. Pune Police Encounter पोलिसांच्या पथकाने त्याच्या अड्ड्यावर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे छापा टाकला असता, त्याने थेट पोलिसांवर पिस्तूल रोखून गोळीबार केला. आत्मरक्षणात पोलिसांनी प्रत्युत्तर फायर करत त्याला जखमी केलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. Pune Latest Crime News

तुम मुझे पकडते क्या, आज तुम्हाराच खेल खतम करता हूं!”…. असे ओरडत अटटी शेखने पोलिस उपनिरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या टीमवर पिस्तुल रोखले. यावेळी त्याच्या पत्नीनेही पोलिसांशी धक्काबुक्की करत बचाव करण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदात परिस्थिती बिघडताच, कांबळे यांनी सूजबूज दाखवत आत्मरक्षणात पिस्तुलातून फायर केले. गोळ्यांच्या चकव्यात अटटी शेख खाली कोसळला.

हा आरोपी पुण्यातील टोळीप्रमुख टिपू ऊर्फ रिजवान पठाण याचा विश्वासू साथीदार होता. पुणे शहरात खंडणी, दरोडा, खूनाचा प्रयत्न, मोक्का अशा गंभीर गुन्ह्यांत त्याच्यावर 15 प्रकरणं दाखल होती. त्याच्यावर 2021 सालीही मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर घरझडतीदरम्यान पोलिसांनी 2 गावठी बनावटीची पिस्तुले, 9 जिवंत काडतुसे व 2 लोखंडी कोयते जप्त केले आहेत. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात Mohol Police Station अटटी शेख आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago