क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Crime News : पुण्यात आजही ‘डॅडी‘ची धास्ती! अरुण गवळीच्या नावाने 5 कोटीची खंडणी मागणाऱ्या तोतया बीड गॅंग गजाआड

Pune Police Arrested Extortion Gang : लष्कर पोलीस स्टेशन आणि खंडणी विरोधी पथकाची संयुक्त कारवाई; गुन्ह्यातील चारचाकी जप्त

पुणे :- पुण्यात बांधकाम व्यवहारात हस्तक्षेप करत 5 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत लष्कर पोलीस स्टेशन व खंडणी विरोधी पथक-1 गुन्हे Pune Crime Branch Unit 1 शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली आहे. “मी अरुण गवळीचा पी.ए बोलतोय” अशी खोटी बतावणी करून, संगनमताने कट रचत फिर्यादीला पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. Pune Latest Crime News

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर पंकज देशमुख,अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे शाखा) निखिल पिंगळे,पोलीस उप-आयुक्त (परि.2) मिलिंद मोहिते,सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 2) राजेंद्र मुळीक, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (लष्कर विभाग) संगिता अल्फोन्सो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदिप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे पोलीस उप-निरीक्षक राहुल घाडगे आणि अंमलदार महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, रमेश चौधर, प्रविण गायकवाड, प्रमोद गायकवाड, अमोल चव्हाण, लोकेश कदम, सागर हराळ, अमोल कोडीलकर यांनी तपास मोहीम राबवली.

याचबरोबर, खंडणी विरोधी पथक-1 गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, युनिट-4 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे,पोलीस उप-निरीक्षक राजेश्वर पारवे, वैभव मगदुम आणि अंमलदार प्रविण वसंत ढमाळ, रणजित बाळकृष्ण फडतरे, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, बालारफि शेख, रहिम शेख, मयुर भोकरे, मंगेश गुंड, नितीन बोराटे, विनोद महाजन, तुषार खाडे, हरिष मोरे, नागेश कुवर, प्रविण भालचिम, संजय अढारी यांनी संयुक्त कारवाईत सहभाग घेतला.

अटक केलेले आरोपी

1.रोहन शिवाजी गवारे (30, रा. कोरेगाव पार्क)

2.सुदर्शन आसमानराव गायके (27, रा. संभाजीनगर)

3.महेंद्र रामनाथ शेळके (42, रा. बीड)

4.कृष्णा परमेश्वर बुधनर (26, रा. खामगाव, बीड)

यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0