Pune Crime News : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरविलेले महागडे 40 मोबाईल फोन नागरिकांना परत ; नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान
Pune Stolen Mobile Returned By Pune Police: 40 मोबाईल महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हस्तगत, चार लाख किंमतीचे हरवलेले मोबाईल तक्रारदारांना परत
पुणे :- फोन हरवला किंवा चोरीला गेला की तो परत मिळेल याची शाश्वती मालकाला जवळ-जवळ नसतेच. मात्र अलिकडच्या काळात फोन चोरीला गेला असला तरी तो पुन्हा मिळवता येतो याची खात्री पटू लागली आहे. नवीन तंत्रज्ञनामुळं हे शक्य झालं आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी Vishrantwadi police Station ही खात्री त्यांच्या कामगिरीतून पटवून दिली आहे. चोरी केलेले आणि हरविलेले 40 मोबाईल फोन नागरिकांना परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून हे मोबाईल फोन पोलिसांनी Stolen Mobile Return by Pune Police हस्तगत करून एकूण चार लाख किंमतीचे मोबाईल फोन परत देण्यास पोलिसांना यश आले आहे. Pune latest Crime News
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय बादरे यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन परिसरात हरवलेले मोबाईलचा डाटा तयार करून तांत्रिक पद्धतीने तपास करून हरवलेले मोबाईल महाराष्ट्रातील विविध भागातून तसेच कर्नाटक राज्यातून पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी एकूण 40 मोबाईल फोन हस्तगत केले आहे. हिंमत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ – 4 यांच्या हस्ते तक्रारदार यांचे मोबाईल पण परत दिले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आलं आहे. Pune latest Crime News
पोलीस पथक
अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, Pune CP Amitesh Kumar रंजनकुमार शर्मा सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, हिम्मत जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ 4, अनुजा देशमाने सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वपोनि कांचन जाधव, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, वामन सावंत, अमजद शेख, संपत भोसले, संजय बादरे, संदिप देवकाते, किशोर भुसारे, अक्षय चपटे यांनी केली आहे. Pune latest Crime News