Pune Crime News | वपोनि नंदकुमार गायकवाड यांच्याकडून दत्तवाडी ‘शांत’ : दोघांवर MPDA कारवाई
MPDA action in Dattawadi Pune
- गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘ग्राउंड लेव्हल’ प्रयत्न | Pune Crime News
पुणे, दि. २० सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर | Pune Crime News
मुबारक जिनेरीं
पुणे शहर आयुक्तालयातील गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असणारा दत्तवाडी परिसर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी ‘शांत’ ठेवला आहे. परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवून ‘एमपीडीए’ कारवाईचा सपाटा दत्तवाडी परिसरात लावण्यात आला आहे. आज दोघां सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. तर चालू वर्षात आतापर्यंत ७ एमपीडीए कारवाया करण्यात आल्या आहेत. Pune Crime News
सराईत गुन्हेगार १) ओंकार विनोद आल्हाट, वय २० वर्षे, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल, पुणे. व मंत्री निवास वैदवाडी, हडपसर पुणे. व २) अमन अंबिर झारेकरी, वय २१, रा. रुम नं २०२, महालक्ष्मी बिल्डींग, स नं १३२, सिहंगड रोड, पुणे यांच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.
पर्वती पोलीस ठाणे कडील सर्व्हेलन्स पथक यांना हद्दीमधिल रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा अभिलेख तपासुन कायदा व सुव्यवस्थतेचा प्रश्न निर्माण न होण्याकरीता योग्य परीनामकारक प्रतिबंधात्मक कारवाई करणे बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड Police Inspector Nandkumar Gaykwad यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अधिकारी सचिन पवार व पथक यांनी आगामी सन उत्सव व लोकसभा निवडणुक अनुषंगाने पर्वती पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील आरोपी क्र. ०१) ओंकार विनोद आल्हाट, वय २० वर्षे, रा. स.नं. १३०, दांडेकर पुल, पुणे. व मंत्री निवास वैदवाडी, हडपसर पुणे. व क्र. ०२) अमन अंबिर झारेकरी, वय २१, रा. रुम नं २०२, महालक्ष्मी बिल्डींग, स नं १३२, सिहंगड रोड, पुणे. यांना महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींची विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे कारवाई करुन अकोला व चंद्रपुर मध्यवर्ती कारागृह येथे एम. पी. डी. ए. कायद्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले.
आरोपीं विरुध्द लोखंडी धारदार हत्यार व देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे, जबरी दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पर्वती पोलीस स्टेशन कडील सन २०२४ मधिल एम. पी. डी. ए. अंतर्गत आतापर्यंतची ही ०७ वी कारवाई आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविण पाटील, पोलीस उप-आयुक्त परि. ३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उप-निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार दिपक लोधा, पोलीस अंमलदार गोरख मादगुडे व पो. अं. कुमार शिंदे यांनी केली आहे.