Pune Crime Branch Unit 6 News : गुन्हे शाखेच्या युनिट-6 कडून कारवाई
पुणे :- दरोडा तयारीत असणाऱ्या आणि बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या घटक-6 युनिटने अटक केली. Pune Crime Branch Unit 6 त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आणि दोन पुगंळ्या असा एकूण 60 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहेत.
समीर उर्फ कमांडो हनीफ शेख (19 वय,रा. सय्यद नगर हडपसर) आणि यश मुकेश शेलार (20 वय रा. तरडे वस्ती, महंमदवाडी वाडी, पुणे) त्यांच्याविरूध्द बेकायदा अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती गुन्हे शाखा कक्ष-6 प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक आरोपी यश शेलार याच्या विरोधात कोंडवा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. तर लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यात चोरी केल्याची कबुली आरोपीने दिले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सर्व साहित्य असा एकूण बारा लाख 17 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून त्यांना जेरबंद केले आहे.
पोलीस पथक
अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त विवेक मासाळ (अति कार्यभार गुन्हे) सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, यनिट 6 चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, पोलीस हवालदार सुहास तांबेकर, महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.