Pune Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 कडून 13.17 लाखांचे अमली पदार्थ जप्त;मेफेड्रोन प्रकरणात एकाला अटकेत

•पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. पेट्रोलिंग दरम्यान आरोपीला बेड्या
पुणे :- पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून केलेल्या कारवाईमध्ये हडपसर परिसरातून पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 केलेल्या कारवाईमध्ये 13 लाख 17 हजार 500 रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ मुक्त पुणे ही मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथक हडपसर परिसरात गस्त घालत होते. पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सय्यदसाहील शेख यांना मिळालेले बातमीवरुन एक जण मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह (वय 33 रा.लक्ष्मी कॉलनी सोलापुर रोड, पुणे) ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 13 लाख 17 हजार पाचशे रुपये किंमतीचे एमडी (मेफेड्रॉन) जप्त केले आहे. आरोपीच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात एन.डी.पी. एस. ॲक्ट कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.