पुणे, दि. 22 एप्रिल, महाराष्ट्र मिरर :
जेएसपीएम कॉलेज जवळील जागेची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार आरोपी काँग्रेस नेता इम्रान (कट्टा) शेख यास आज दि. 22 रोजी मध्यरात्री वानवडी तपास पथकाकडून मोठ्या शिफातीने ताब्यात घेण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्याचे वपोनि संजय पतंगे, गुन्हे निरिक्षक करणकोट यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे उपनि संतोष सोनवणे व त्यांच्या पथकाने सदर कामगिरी केली आहे.
फिर्यादी संघवी व परमार यांची जागा बळकावण्यासाठी बेकायदेशीर पत्र्याचे शेड बांधून राज गुलाब शेख, बक्षु भाई, इम्रान कट्टा व इतर यांनी कट रचून बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुरन. १६२/२०२४ भादंवि १२० ब, ३४, ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४५२, ५०६ अन्वये गुन्हा दाखल होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नरत होते परंतू कोर्टाकडून जामीन फेटाळण्यात आल्याने आरोपी फरार झाले होते.
आर्थिक फायद्यासाठी कट रचून जागेचे बनावट कागदपत्र तयार करून जागा बळकावल्याप्रकरणी सराईत राज शेख व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हडपसर येथील जेएसपीएम कॉलेज शेजारील १० गुंठ्याचे बनावट कागदपत्र तयार करून जागा बळकावल्याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला होता. FIR on Land Mafia
राज गुलाब शेख हा सराईत भू माफिया असून त्याने अनेकांना जागेच्या व्यवहारातून गंडा घातल्याची माहिती समोर आली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून मास्टर माईंड राज शेख फरार आहे.
याबाबत जागा मालक विना संघवी यांच्या तर्फे फिर्यादी विजय संघवी यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. FIR on Land Mafia
याबाबत अधिक माहिती अशी कि, संघवी यांनी सन २००५ मध्ये राजकुमार कोयाळीकर, चंद्रकांत घुले व इतर यांचेकडून हडपसर सर्वे नं. ५९ हिस्सा नं. १/३/१, १/४/२, १/४/३, १/५/५, १/५/१ व इतर यातील २६.५ गुंठे जागा करारनामा करून दुय्यम निबंधक कार्यालय-३ येथे दस्त क्रं. ६३५३/२००५ करून विना संघवी व पुष्पाबाई परमार यांच्या नावाने नोंदवून घेतली होती. यानंतर सन २०१३ साली सदर मिळकतीबाबत खरेदीखत करण्यात आला होता. खरेदीदस्त नोंदणी झाल्यानंतर फिर्यादी यांच्याकडून सदर जागेवर कंपाउंड करण्यात आले होते. FIR on Land Mafia
यानंतर सदर मिळकतीच्या १० गुंठ्यांवर काही लोकांनी बेकायदा ताबा घेत रहिवास सुरु केला होता. यातील लोकांना फिर्यादी यांच्याकडून विचारणा करण्यात आली असताना त्यांनी सदर जागा राज गुलाब शेख, बक्षु भाई व इतर यांच्याकडून पैसे देऊन दस्तऐवज तयार करून तयार करून घेतली असल्याचे उघडकीस आले होते.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे PSI Santosh Sonwane करीत आहेत.
इम्रान शेख याचा हडपसर वानवडी प्रभागातील वाढता प्रभाव पाहता सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कमी कालावधी सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख झाली होती. नागरिक त्यांना दयावान म्हणून ओळखू लागले होते. काँग्रेस पक्षातील मातब्बर नेत्यांसमवेत त्यांची जवळीक वाढली होती. काँग्रेस नेते नाना पटोले, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री शिवरकर यांनी इम्रान शेख यांना प्रोत्साहीत केले होते अशातच राजकिय मैदानातून इम्रान शेख यांना बाहेर काढण्यासाठी विरोधकांकडून त्यांची ‘हिट’ विकेट काढण्यात आल्याचा आरोप त्यांचे निकटवर्तीय करीत आहेत.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…