Pune Crime News | हांडेवाडी रोड जैन टाऊनशिप जवळ दोन गटात तुफान राडा : वानवडी पोलिसांच्या तात्काळ कारवाईने अनर्थ टळला
- Pune Crime News | दोन्ही गटाकडून तक्रार देण्यास टाळाटाळ : वपोनि संजय पतंगे यांच्याकडून कठोर कारवाई करत गुन्हा दाखल
पुणे, दि. १२ जुलै, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर)
पूर्ववैमनस्यातून रागाने बघितल्याने बुधवारी (दि. १०) रात्री उशिरा हांडेवाडी रोड जैन टाऊनशिप जवळ दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी तलवार दांडक्याच्या मारामारीत दोन जण जखमी झाले. १२ ते १५ जणांच्या टोळक्यात भांडण विकोपाला गेले असतानाच तलवारीचे सपासप वार झाल्याने दहशत पसरली. वानवडी पोलीस मोक्याच्या क्षणी घटनास्थळावर पोहचल्याने एकाचा जीव वाचला व मोठा अनर्थ टळला. (Pune Crime News)
याबाबत पोलीस शिपाई बालाजी वाघमारे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी १. आरकान तसबीर शेख २. अमन तसबीर शेख ३. रेहान रियाज खान ४. सादिक उर्फ बुरुन शेख ५. आफताब शेख ६. दानिश इब्राहिम शेख ७. फराज वजीर शेख ८. अमीन असिफ खान ९. कैफ सलीम शेख १०. शाहरुख सलीम शेख रा. सय्यद नगर, हडपसर ११. आयन अजीम शेख १२. आबूजर आसिफ शेख १३. अरबाज शेख रा. रामटेकडी, हडपसर , पुणे यांच्या विरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस वेळेवर पोहोचले आणि अनर्थ टळला
हांडेवाडी रोड जैन टाऊनशिप जवळ काही मुले दंगा करत असतानाची माहिती प्राप्त होताच वपोनि संजय पतंगे (Senior Police Inspector Sanjay Patange) यांच्या आदेशावरून तपास पथकाचे सपोनि संजय आदलिंग (Api Sanjay Aadling), पोलीस अंमलदार दाऊद सय्यद (PC Daud Sayyad), सर्फराज शेख (PC Sarfaz Shaikh) यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका आरोपीच्या हातात तलवार होती व तो एकावर प्राणघातक हल्ला चढवीत होता. यावेळी पोलिसांनी योग्य वेळी आरोपींना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. (Pune Crime News) Pune Police
गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तक्रार देण्यास टाळाटाळ
तलवार, दांडक्याने मारहाण झाल्यानंतर दोन्ही टोळक्याकडून गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तक्रार देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. गुन्ह्याची व्याप्ती व गंभीरता लक्षात घेत वानवडीचे वपोनि संजय पतंगे यांनी पोलीस शिपाई यांना फिर्याद देण्यास सांगितले व टोळक्यावर गुन्हा नोंद केला.
तपास पथकाकडून आरोपींची धरपकड
सार्वजनिक ठिकाणी तलवार, दांडके यांनी मारामारी करून दंगा करून दहशत माजविणाऱ्या टोळक्यातील १२-१५ जणांची ओळख निष्पन्न होताच तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी ३ आरोपीना अटक केली. इतर आरोपींची धरपकड करण्यात येत आहे.
Call Morphing : सायबर चोरट्यांकडून कुमार बिल्डरला 50 लाखांचा चूना (maharashtramirror.com)