Pune Crime News : नागालँड राज्यातील महिलांना लुटणाऱ्या टोळीला बाणेर पोलिसांनी केले जेरबंद
•महिला वर्गांना जबरदस्ती लुटणाऱ्या टोळीचा चतु:श्रृंगी पोलिसांच्या तपास पथकाने मुसक्या आवळत जेरबंद केले आहे, टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग
पुणे :- पुणे सह राज्यभरात महिला वर्गांना जबरदस्ती लुटणाऱ्या तसेच बाणेर टेकडीवर वॉकिंग करण्याकरिता आलेल्या नागालँड राज्यामधील महिलांना जबरदस्तीने लुटणाऱ्या तीन आरोपींना बाणेर पोलिसांच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख दहा हजार सातशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बाणेर/चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 13 ऑक्टोबरच्या रोजी दुपारच्या सुमारास, बाणेर टेकडी येथे वाॅकींग करण्यासाठी गेलेल्या नागालँन्ड मधील महिला फिर्यादी अबिनीयु खांन्गबुबो चवांग, (36 वय रा-पुणे. मुळ जि. पेरेन, राज्य-नागालँड), या व त्यांच्या मैत्रीन चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई असे वाॅकींग करुन परत जात असताना 4 अनोळखी व्यक्तीने त्या ठिकाणी येवून त्यांना शिवीगाळ केली.लोखंडी हत्याराने मारहाण करुन त्यांचेकडील ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, बर्डस, सॅक असा एकुण 51 हजारांचा मुद्देमाल, जबरदस्तीने हिसकावुन घेवून पळुन गेले होते. त्याबाबत यातील फिर्यादी यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम-309 (6), 352,3 (5), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम-37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
घटनास्थळी वरिष्ठांनी भेट देवून दाखल गुन्हयाबाबत सुचना दिल्याने गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन घेतली. यातील आरोपी द्रापेत ऊर्फ विशाल प्रभाकर समुखराव, (19 वय , रा-कुंभार यांची चाळ, जाधवाडी चिखली पुणे. मुळ रा.ता. चाकुर, जि. लातुर) आणि 2 अल्पवयीन मुलांनी यांच्या हददीत आणि दुसऱ्या हद्दीत शोध घेवुन त्यांचा मोटार सायकलवर पाठलाग करुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेतले. त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयात जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेलेला मोबाईल,गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल, कोयता असा एकुण 1 लाख 10 हजार 700 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-4 पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजयानंद पाटील, तपास पथकाचे अधिकारी, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, सुधाकर माने, इरफान मोमीन,बाबासाहेब दांगडे,श्रीधर शिर्के, यांनी केली आहे.