पुणेक्राईम न्यूज
Trending

Pune Crime News | कार चोरट्यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे, दि. २२ ऑगस्ट, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Crime News

वाकेश्वर चौकाजवळ सुस रोड, पाषाण येथून टाटा कंपनीची टिगोर कार चोरी करणाऱ्या चोरट्यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वपोनि महेश बोळकोटगी (Sr.Pi.Mahesh Bolkotgi) यांच्या नेतृत्वाखाली चतुःश्रृंगी तपास पथकाने सदर कामगिरी केली आहे.

याप्रकरणी आरोपी १) महेश श्यामराव शिळीमकर, वय-२७ वर्ष, रा-मांगडेवाडी, कात्रज पुणे. २) गोविंद हरिचरण गौतम, वय-२३ वर्ष, रा सुतारवाडी मस्जिदजवळ, पाषाण पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक ०८ जुलै २०२४ रोजी वाकेश्वर चौकाजवळ सुस रोड, पाषाण पुणे येथुन फिर्यादी दर्शन प्रशांत बोदार्ड, वय-३० वर्ष, धंदा-व्यवसाय, रा-११६/७, स्नेह श्रध्दा पाहिला मजला, शिक्षक कॉलनी सुस रोड पुणे यांची ग्रे रंगाची टाटा कंपनीची टिगोर चारचाकी गाडी क्र.एम.एच.२३ बी.सी.६१९४ ही चोरी गेली होती. याबाबत चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, गु.र.नं.६०४/२०२४ भा. न्या. संहिता कलम- ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाचा पुढील तपास हा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदार करीत असताना तपास पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी यातील आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करुन यातील आरोपी नामे १) महेश श्यामराव शिळीमकर, वय-२७ वर्ष, रा-मांगडेवाडी, कात्रज पुणे. २) गोविंद हरिचरण गौतम, वय-२३ वर्ष, रा सुतारवाडी मस्जिदजवळ, पाषाण पुणे. यांचा हददीत/परहददीत शोध घेवुन घेवुन त्यांना शिताफीतीने ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली एकुण-०६,५०,०००/-रुपये किंमतीची चारचाकी गाडी हस्तगत करुन उत्तम कामगिरी केली आहे.

तसेच सदरची कामगिरी ही Pune पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त सो पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०४ पुणे शहर हिंम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुः श्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी, सपोनि पाटील, पोलीस उप-निरीक्षक, प्रणिल चौगले, पोलीस हवालदार श्रीकांत वाघवले, पोलीस हवालदार बाबुलाल तांदळे, पोलीस हवालदार सुधाकर माने, पोलीस हवालदार इरफान मोमीन, पोलीस हवालदार बाबासाहेब दांगडे, पोलीस हवालदार विशाल शिर्के, पोलीस हवालदार किशोर दुशिंग, पोलीस हवालदार श्रीधर शिर्के, पोलीस अंमलदार प्रदिप खरात, पोलीस अंमलदार बाळासाहेब भांगले यांनी केली आहे. Pune Crime News |

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0